न्यायमूर्ती नियुक्त्यांमध्ये जातीय पक्षपात - गवई  
राष्ट्रीय

न्यायमूर्ती नियुक्त्यांमध्ये जातीय पक्षपात - गवई

उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी आणि अल्पसंख्यांकांच्या कमी प्रतिनिधित्वाबाबत माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी आणि अल्पसंख्यांकांच्या कमी प्रतिनिधित्वाबाबत माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये गुणवत्तेऐवजी जातीला प्राधान्य, समावेशकतेचा अभाव आणि पक्षपात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी सरन्यायाधीश गवई यांनी, आपल्या सरन्यायाधीशपदाच्या कार्यकाळात विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व दिल्याचे नमूद केले. मात्र, अलीकडील नियुक्त्यांमध्ये विशिष्ट समाजघटकाला प्राधान्य दिले जात असून, वंचित समुदाय, महिला आणि अन्य समाजघटकांना डावलले जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

उच्च न्यायालयात २०१८ पासून नियुक्ती झालेल्या ७१५ न्यायाधीशांमध्ये केवळ २२ एससी, १६ एसटी, ८९ ओबीसी आणि ३७ अल्पसंख्याक समुदायातील असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. सुमारे ८० टक्के नियुक्त्या खुल्या प्रवर्गातील असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. न्यायव्यवस्थेत समावेशकता आणि समान प्रतिनिधित्वासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १६ हजार बॅनर्सवर कारवाई; दीड महिन्यांत मात्र केवळ १७ जणांवर गुन्हे दाखल

महाविकास आघाडीत शरद पवार गट लक्ष्य; ठाकरे गट आणि काँग्रेसची जोरदार टीका

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

पूर्वसूचना न देता सरकारविरुद्ध दावा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी