राष्ट्रीय

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांची कैद

वृत्तसंस्था

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना शुक्रवारी न्यायालयाने उत्पन्नाहून अधिक संपत्तीच्या प्रकरणात चार वर्षांची कैद व ५० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडातील पाच लाख रुपये सीबीआयला दिले जातील. तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. न्यायालयाने चौटाला यांची हेली रोड, पंचकुला, गुरुग्राम व असोला येथील संपत्ती जप्त करण्याचेही आदेश दिले आहेत.

सीबीआयचे वकील अजय गुप्तांनी आरोपीने वैद्यकीय चाचण्यांसाठी १० दिवसांची सवलत देण्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली; पण न्यायालयाने वैद्यकीय चाचण्या तुरुंगात करण्याचे निर्देश देत त्यांना तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. चौटालांचे पुत्र अभय चौटाला यांनी या शिक्षेला वरिष्ठ कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यात चौटालांच्या वकिलांनी त्यांचे वय व प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना सहानुभूती दाखवण्याची विनंती केली. ते म्हणाले - “चौटाला ८७ वर्षांचे आहेत. प्रदीर्घ काळापासून आजारी आहेत. त्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे; पण आता ते ९० टक्के दिव्यांग झालेत. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांना स्वतःचे कपडेही बदलता येत नाहीत.यांना शुक्रवारी न्यायालयाने उत्पन्नाहून अधिक संपत्तीच्या प्रकरणात चार वर्षांची कैद व ५० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडातील पाच लाख रुपये सीबीआयला दिले जातील. तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. न्यायालयाने चौटाला यांची हेली रोड, पंचकुला, गुरुग्राम व असोला येथील संपत्ती जप्त करण्याचेही आदेश दिले आहेत.

सीबीआयचे वकील अजय गुप्तांनी आरोपीने वैद्यकीय चाचण्यांसाठी १० दिवसांची सवलत देण्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली; पण न्यायालयाने वैद्यकीय चाचण्या तुरुंगात करण्याचे निर्देश देत त्यांना तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. चौटालांचे पुत्र अभय चौटाला यांनी या शिक्षेला वरिष्ठ कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यात चौटालांच्या वकिलांनी त्यांचे वय व प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना सहानुभूती दाखवण्याची विनंती केली. ते म्हणाले - “चौटाला ८७ वर्षांचे आहेत. प्रदीर्घ काळापासून आजारी आहेत. त्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे; पण आता ते ९० टक्के दिव्यांग झालेत. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांना स्वतःचे कपडेही बदलता येत नाहीत.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार