देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे केशूब महिंद्रा यांचे आज निधन झाले. ९९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. १९६८मध्ये त्यांच्याकडे महिंद्रा समूहाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ४४ वर्षे महिंद्रा समूहाचे नेतृत्व केले. २०१२मध्ये अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. केशूब महिंद्रा हे उद्योगपती आनंद महिंद्राचे काका आहेत.
ज्येष्ठ उद्योगपती केहसूबा महिंद्रा यांनी टाटा स्टील, टाटा केमिकल्स, आयसीआयसीआय, आयएफसी, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) आणि इंडियन हॉटेल्स या कंपन्यांच्या बोर्ड आणि कॉन्सिलमध्येही काम केले आहे. याचवर्षी ९ ऑक्टोबरला ते आपल्या शंभरीमध्ये पदार्पण होते. फोर्ब्सने जारी केलेल्या २०२३च्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. फोर्ब्सच्या बिलिनिअर्स लिस्टनुसार त्यांची १.२ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.