राष्ट्रीय

Imran Khan Attacked : मोठी बातमी! पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला

इम्रान खान हे लाँग मार्च घेऊन इस्लामाबादच्या दिशेने निघालेले होते. त्यांच्यावर गुजरावाला येथील अल्लाहवाला चौकात हल्ला करण्यात आला.

प्रतिनिधी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅली दरम्यान गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी लाहोरला रवाना करण्यात आले. तसेच, ते सुखरूप असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

इम्रान खान हे लाँग मार्च घेऊन इस्लामाबादच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यावर गुजरावाला येथील अल्लाहवाला चौकात हल्ला करण्यात आला. जनतेला संबोधन करत असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या कंटेनरवर गोळीबार केला. यानंतर रॅलीमध्ये एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाकिस्तानी माध्यमांवर प्रसारित झालेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या पायात गोळी लागल्यानंतर त्यांना बुलेटप्रूफ गाडीतुन रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाकरे सेना-मनसे एकत्र? नव्या युतीची आठवडाभरात होणार घोषणा

अजित पवारांना हवीय महायुती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत - मुख्यमंत्री; शिंदे सेनेची ६० जागांवर बोळवण?

बेटिंग ॲप : युवराज, सोनू सूदसह अनेकांची मालमत्ता जप्त; ED ची मोठी कारवाई; उथप्पा, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती यांचाही समावेश

SIR मुळे तमिळनाडूत ९८ लाख मतदारांची नावे वगळली