राष्ट्रीय

नरसिंह राव, चौधरी चरणसिंह, स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान

नरसिंह राव यांचे पुत्र पी. व्ही. प्रभाकर राव, चौधरी चरणसिंह यांचे नातू जयंत चौधरी, एम. एस. स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव आणि कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा किताब स्वीकारला. या समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी उपस्थित होते.

Swapnil S

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि चौधरी चरणसिंह, कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना शनिवारी मरणोत्तर 'भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी किताब राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात प्रदान करण्यात आला. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रविवारी 'भारतरत्न' प्रदान करण्यात येणार आहे.

नरसिंह राव यांचे पुत्र पी. व्ही. प्रभाकर राव, चौधरी चरणसिंह यांचे नातू जयंत चौधरी, एम. एस. स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव आणि कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा किताब स्वीकारला. या समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते अडवाणींना आज 'भारतरत्न' प्रदान करणार

यंदा पाच जणांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही 'भारतरत्न' जाहीर झाला असून त्यांना हा किताब रविवारी त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती