FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

अन्न सुरक्षा नियामक ‘एफएसएसएआय’ ने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी नेस्ले इंडियाच्या तीन बाल-पोषण उत्पादनांबाबत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अन्न सुरक्षा नियामक ‘एफएसएसएआय’ ने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी नेस्ले इंडियाच्या तीन बाल-पोषण उत्पादनांबाबत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र, कंपनीने आपण लागू असलेल्या नियमांचे ‘पूर्ण पालन’ करत असल्याचा दावा केला आहे.

ही कायदेशीर कारवाई ‘नॅन एक्सेला प्रो स्टेज १’ , ‘लॅक्टोजेन प्रो १’ आणि एका ‘फॉलो-अप फॉर्म्युला’ उत्पादनांच्या संदर्भात सुरू करण्यात आली आहे.

‘नॅन एक्सेला प्रो स्टेज १’ बाबत, अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण ने ‘5HMOs’ आणि ‘व्हे प्रोटीन’ यांच्याशी संबंधित दाव्यांवर आक्षेप नोंदवला; तर ‘लॅक्टोजेन प्रो १’ मध्ये ‘व्हे प्रोटीन’ हे पचायला हलके असल्याचे वर्णन करणाऱ्या दाव्याकडे लक्ष वेधले.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या जाहिरात साहित्यासह या तीन उत्पादनांची तपासणी केल्यानंतर, नियामकाने सांगितले की त्यांनी नेस्ले इंडियाकडून या दाव्यांबाबत स्पष्टीकरण मागवले होते.ही दोन्ही उत्पादने 'अन्न सुरक्षा आणि मानके नियमन, २०२०' मधील नियम ४(२) चे उल्लंघन करणारी असल्याचे आढळले. हे नियम बालकांसाठीच्या आहाराची विक्री वाढवण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या जाहिराती किंवा साहित्यावर निर्बंध घालतात, असे ‘एफएसएसआयए’ ने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘बायोटिन’ च्या प्रमाणानुसार निकृष्ट

नेस्ले इंडियाने उत्पादित केलेल्या एका 'फॉलो-अप फॉर्म्युला'चा नमुना प्रयोगशाळेतील विश्लेषणादरम्यान ‘बायोटिन’ च्या प्रमाणानुसार निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळले. हा नमुना पुनर्विश्लेषणासाठी पाठवण्यात आला होता आणि संदर्भ प्रयोगशाळेलाही तो २०२० च्या नियमांनुसार विहित केलेल्या बायोटिनच्या निकषांशी विसंगत असल्याचे आढळले, असे ‘एफएसएसएआय’ ने सांगितले.या निष्कर्षांच्या आधारे, नियामकाने "तीन उत्पादनांच्या संदर्भात नेस्ले इंडियाविरुद्ध तीन स्वतंत्र न्यायनिर्णय प्रकरणे दाखल केली आहेत.

NEET Paper Leak : सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश NTA ची पाहणी करणार

राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीला मिळणार वेग; दोन रेल्वे प्रकल्पांसाठी ९९० कोटी

१०६ पदकांचा विक्रम मोडण्याचे यंदा आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून शानदार प्रारंभ, भारताचे तब्बल ४९६ खेळाडूंचे पथक होणार सहभागी

मुंबईत साथीच्या आजारांचा ताप; तीन महिन्यांत मलेरियाचे ५,९८४ तर डेंग्यूच्या २,१६१ रुग्णांची नोंद 

दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र