Photo : X (@jacobincambodia)
राष्ट्रीय

'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर मनपाल पोलिसांच्या ताब्यात; कंबोडियावरून आणले भारतात

कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड गुंड मनपाल बादली याला हरयाणआ पोलिसांच्या विशेष कृती दलाने कंबोडियामध्ये अटक करून भारतात आणले आहे. मनपाल बादलीवर ७ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड गुंड मनपाल बादली याला हरयाणआ पोलिसांच्या विशेष कृती दलाने कंबोडियामध्ये अटक करून भारतात आणले आहे. मनपाल बादलीवर ७ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. जवळपास १० दिवसांपूर्वी गुंड मनपाल बादलीला कंबोडियात ताब्यात घेण्यात आले होते.

मनपाल बादली २९ ऑगस्ट २०१८ रोजी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो परदेशात गेला आणि त्याची टोळी चालवत होता.

मनपालवर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुरुंगात असतानाही मनपालवर खून केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला मनपाल ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम शिकत होता, परंतु २००० मध्ये त्याच्या काकांच्या हत्येनंतर तो गुन्हेगारीच्या जगात आला. मनपाल बादली हा हरयाणा पोलिसांच्या यादीत नंबर-१ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

अंजना कृष्णा धमकी प्रकरणात बावनकुळे यांचे अजितदादांना समर्थन