राष्ट्रीय

भाजपविरोधी घोषणा देणे गुन्हा नाही - मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

न्यायालयाने सोफिया यांच्यावरील एफआयआर रद्द केला आहे

नवशक्ती Web Desk

चेन्नई : भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देणे हा गुन्हा ठरत नसल्याचा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.

लोईस सोफिया नावाच्या संशोधक विद्यार्थिनीने २०१८ साली थुथूकुडी विमानतळावर विमानात बसून फॅसिस्ट भाजप सरकारचा निषेध असो, अशा आशयाच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी त्या विमानात भाजपचे तत्कालीन तामिळनाडू राज्य प्रमुख तमिलीसाई सुंदरराजन हे हजर होते. ते आता तेलंगणचे राज्यपाल आणि पुड्डुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. अशा घोषणा देणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने सोफिया यांच्यावरील एफआयआर रद्द केला आहे.

ऊसदराचे आंदोलन चिघळणार? कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न

मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी

स्वदेशी 'इक्षक' जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

मृत्यूपत्राच्या माध्यमातून भाडेकरार करू शकत नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाचे नेतृत्व लवकरच IPS अधिकाऱ्याकडे; गृह खात्याचा हिरवा कंदील