राष्ट्रीय

गोव्यातील मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन तस्करांना अटक

गोव्यातील मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करून महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे विभागाने इंदापूर, सोलापूर आणि सातारा परिसरात धाडी टाकून सुमारे २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन मुख्य तस्करांना अटक केली आहे.

Swapnil S

पुणे: गोव्यातील मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करून महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे विभागाने इंदापूर, सोलापूर आणि सातारा परिसरात धाडी टाकून सुमारे २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन मुख्य तस्करांना अटक केली आहे.

प्रेम सोमनाथ भांडवलकर (रा. बारामती) आणि अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) असे अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर परिसरातील कांदलगाव येथून एका मालवाहू वाहनातून गोव्यातील मद्याची मोठी खेप नेली जाणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संबंधित वाहनाचा पाठलाग केला आणि ते अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये २५ प्लास्टिक ड्रम आणि मद्याच्या बाटल्यांची १,४०० बुचे सापडली. याप्रकरणी पथकाने प्रेम सोमनाथ भांडवलकर आणि अक्षय अधिकराव देशमुख या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

तपासादरम्यान या तस्करीची धक्कादायक कार्यपद्धती समोर आली आहे. गोव्यात विदेशी मद्य स्वस्त मिळत असल्याने, आरोपी हे मद्य प्लास्टिकच्या मोठ्या ड्रममध्ये भरून छुप्या पद्धतीने राज्यात आणत असत. त्यानंतर हे ड्रममधील मद्य बाटल्यांमध्ये भरून त्यांची चढ्या दराने विक्री केली जात असे. या प्रकारामुळे शासनाचा मोठा महसूल बुडवून फसवणूक केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींच्या अटकेनंतर पथकाने सोलापूर जिल्ह्यातील माढा परिसरात राहणाऱ्या अक्षय देशमुख याच्या घरावर छापा टाकला. तेथून गोव्यातील विदेशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या आणि २,००० अतिरिक्त बुचे असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये