Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद  
राष्ट्रीय

Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. आगीपूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

उत्तर गोव्यातील अर्पोरा भागात असणाऱ्या बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) या नाईटक्लबमध्ये शनिवारी (दि.६) भीषण आग लागली. या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आग लागण्याच्या काही सेकंदाआधीचा थरारक क्षण स्पष्टपणे कैद झाला आहे.

घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओमध्ये एका मंचावर बेली डान्सर नृत्य करताना दिसते. साधारण दहा सेकंदांनंतर वरच्या छतामधून अचानक आग उसळताना दिसून येतेय. अवघ्या एक-दोन सेकंदांतच आग संपूर्ण छतावर पसरते. आगीचे प्रमाण वाढताच महिला डान्सर आणि अन्य कर्मचारी घाबरून पळतात. व्हिडीओत क्लबमध्ये दाटलेला धूर पाहायला मिळतोय.

या व्हिडीओमध्ये आग लागली त्या क्षणी कोणतीही अग्निसुरक्षा यंत्रणा (फायर सेफ्टी सिस्टम) कार्यरत झाल्याचे दिसून येत नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, "ही आग गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली."

गोव्याचे पोलीस महासंचालक म्हणाले की, "पोलिस कंट्रोल रूमला रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी याची माहिती मिळाली आणि तात्काळ आपत्कालीन पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. नंतर आग नियंत्रणात आणण्यात आली आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले."

नियमांचे उल्लंघन करून क्लब सुरू

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, "मृतांमध्ये बहुतांश किचन स्टाफ होते, त्यात तीन महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत तीन ते चार पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात या नाईटक्लबने आवश्यक अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन करून क्लब सुरू ठेवण्यास परवानगी देणाऱ्या व्यवस्थापनावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन