राष्ट्रीय

साबरमती एक्स्प्रेस आग प्रकरणातील ८ जणांना जामीन; 'या' निकषावर दिला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय

२००२मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला काही व्यक्तींकडून आग लावण्यात आली होती, यामध्ये ५८ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता

नवशक्ती Web Desk

आज सर्वोच्च न्यायालयाने २००२मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लावलेल्या ८ आरोपींची जामिनावर सुटका केली. या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गुजरात दंगलीप्रकरणी सत्र न्यायालायने २०११च्या मार्च महिन्यात ११ आरोपींना फाशीची तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच, याप्रकरणी ६३ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर, २०१७मध्ये गुजरात उच्च न्यायालायने ११ जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. यानंतर २०१८ला जन्मठेपेतून आरोपींना जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा आज निकाल लागला.

सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हंटले की, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची १७ वर्षे शिक्षा भोगून झाली असून त्यांच्या वागणुकीमध्ये सुधारणा दिसत आहे. तसेच, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवर लवकर सुनावणी होण्याची शक्यता नसल्याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने अटी-शर्थींसह ८ जणांना जामीन दिला. दरम्यान, इतर ४ जणांचा जामीन न्यायालायने फेटाळून लावला आहे.

राजकारणातला खोटा सिक्का

आजचे राशिभविष्य, २३ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू