राष्ट्रीय

सोने २७६ रुपयांनी, तर चांदी ४८७ रुपये स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,६४३.५ डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव १८.६२ डॉलर प्रति औंस होता.

वृत्तसंस्था

जागतिक बाजारात बुधवारी सोन्याचा भाव २७६ रुपयांनी घसरून ५०,४७१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तत्पूर्वी, मागील सत्रात हा मौल्यवान धातूचा दर ५०,७४७ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

तर बुधवारी चांदीचा भावही ४८७ रुपयांनी घसरून ५६,४०६ रुपये प्रति किलो झाला, जो मागील सत्रातील ५६,८९३ रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,६४३.५ डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव १८.६२ डॉलर प्रति औंस होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांचा विश्वास आहे की, गुंतवणूकदारांनी संमिश्र संकेतांचे मूल्यांकन केल्यामुळे स्पॉट कॉमेक्स गोल्ड थोड्या कमकुवततेने व्यवहार करत आहे. ही कमकुवतता ट्रेझरी उत्पन्नातील वाढ आणि धोरण निर्मात्यांच्या बाजारातील सततच्या नकारात्मक अंदाजांमुळे आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस