सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर 
राष्ट्रीय

सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर

जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या जोरदार वाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली. सोन्याचा भाव २,५०० रुपयांनी वधारून १.५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम या एका महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Swapnil S

नवी दिल्ली : जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या जोरदार वाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली. सोन्याचा भाव २,५०० रुपयांनी वधारून १.५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम या एका महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

९९.९ टक्के शुद्धतेचे सोने २,५०० रुपये म्हणजेच १.७ टक्क्यांनी वाढून १,५०,००० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर बंद झाले. मंगळवारी सोन्याचा भाव १,४७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. यापूर्वी ६ जुलै रोजी सोन्याने ही पातळी गाठली होती, जेव्हा ते १,५०,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. गेल्या सत्रात स्थिर राहिलेल्या चांदीनेही पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. चांदीचा भाव ६,२०० रुपयांनी वाढून २,३२,७०० रुपये प्रति किलोग्राम या एका महिन्याच्या उच्चांकी पातळीजवळ पोहोचला. मागील सत्रात चांदी २,२६,५०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा