Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

ऑक्टोबरमधील घसरणीनंतर सोमवारी सोन्याच्या किमतीत ५०० रुपयांची किंचित वाढ होऊन भाव प्रति १० ग्रॅम १,४२,५०० रुपयांवर पोहोचले. दिवाळीपूर्वी सुवर्णकार आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या सणासुदीच्या खरेदीमुळे सोन्याला पुन्हा काहीसा आधार मिळाला.

Swapnil S

नवी दिल्ली : ऑक्टोबरमधील घसरणीनंतर सोमवारी सोन्याच्या किमतीत ५०० रुपयांची किंचित वाढ होऊन भाव प्रति १० ग्रॅम १,४२,५०० रुपयांवर पोहोचले. दिवाळीपूर्वी सुवर्णकार आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या सणासुदीच्या खरेदीमुळे सोन्याला पुन्हा काहीसा आधार मिळाला.

९९.९ टक्के शुद्धतेचे सोने शनिवारी प्रति १० ग्रॅम १.४२ लाख रुपयांवर बंद झाले होते. मात्र, चांदीचे भाव प्रति किलो १.८६ लाख रुपयांवर स्थिर राहिले.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, सणाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णकार आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी वाढवली. यामुळे धातूच्या किमतींना आधार मिळाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यामुळे डॉलरमध्ये मूल्य मोजल्या जाणाऱ्या बुलियन (चांदी-सोने) आयात करण्याचा खर्चही वाढला. ऑक्टोबर महिन्यात सोन्यात मोठी घसरण झाली होती; ३० सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या प्रति १० ग्रॅम १,४९,३०० रुपयांवरून सोन्याचे भाव ७,३०० रुपयांनी घसरले होते. या कालावधीत चांदीमध्ये आणखी तीव्र पडझड पाहायला मिळाली आणि प्रति किलो २.३२ लाख रुपयांवरून चांदी ४६,००० रुपयांनी घसरली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

...तर विमान प्रवास करू नका; ७०० टक्के दरवाढ याचिकेवर सुप्रीम कोर्टाची धक्कादायक सूचना

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? नाराज नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; पवार माय-लेक वगळून NCP च्या विलीनीकरणाची चाचपणी

‘दिया’च्या आवाहनावरून गदारोळ; फटाके न फोडण्याच्या मिर्झाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पेटले, भाजपच्या आक्षेपानंतर व्हिडीओ गायब