राष्ट्रीय

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद

भाजपशी झुंज देण्यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलानेही जोरदार ताकद लावली

नवशक्ती Web Desk

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी बुधवार, १० मे रोजी मतदान होत आहे. मतमोजणी १३ मे रोजी होणार आहे. मतदानपूर्व चाचण्या सत्तारूढ भाजपविरोधात गेल्याने भाजपने येथे देशभरातील नेत्यांना प्रचारात उतरवले होते, तर भाजपशी झुंज देण्यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलानेही जोरदार ताकद लावली आहे.

गेले पंधरा दिवस भाजप, काँग्रेससह प्रमुख पक्षांचे देशभरातील प्रमुख नेते कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. भाजपची सारी भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर आहे. दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य पुन्हा जिंकून भाजप ३८ वर्षांचा इतिहास मोडणार का? ही उत्सुकता आहे. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला कर्नाटक जिंकणे महत्त्वाचे आहे. येथे सत्ता आल्यास काँग्रेसचे महत्त्व वाढणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने सत्तेसाठी सारी ताकद लावली आहे.

यावेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचा मुद्दा उपस्थित केल्याने भाजपने याविरोधात जोरदार रान उठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक सभेवेळी बजरंग बलीचा जयघोष करणाऱ्या घोषणा देऊन काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. शिवाय केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास विकासाला गती मिळेल, हा मुद्दाही मोदींनी ‘डबल इंजिन सरकार’ म्हणून प्रचारात आणला. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा विषयही प्रचाराच्या मध्यवर्ती राहिला. स्थिर सरकारची घोषणा सर्वच पक्षांनी दिली आहे. पंतप्रधानांनी १९ मोठ्या सभा तसेच सहा रोड शो केले. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी २०६ सभा तसेच ९० रोड शो केले. काँग्रेसच्या प्रचारात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही सहभाग घेतला.

कर्नाटक विधानसभा

एकूण जागा : २२४

रिंगणातील उमेदवार : २६२१

एकूण मतदार : ५,२४,११,५५७

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत