Goods Train Viral Video Social Media
राष्ट्रीय

लोको पायलटला आली चहाची तलप, हँडब्रेक न लावल्याने मालगाडी सुसाट निघाली अन् घडलं...पाहा व्हायरल Video

सोशल मीडियावर मालगाडीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांचा थरकाप उडाल आहे.

Naresh Shende

सोशल मीडियावर मालगाडीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांचा थरकाप उडाल आहे. जम्मुच्या कथुआ येथून लोको पायलटशिवाय निघालेली मालगाडी पठाणकोटच्या दिशेनं निघाली. लोको पायलटला चहाची तलप आल्यानं तो मालगाडीतून खाली उतरला पण त्याने ट्रेनचा हँडब्रेक ओढला नव्हता. ट्रॅकवर उतरण असल्याने मालगाडी थेट पठाणकोटच्या दिशेनं निघाली. लोको पायलट नसतानाही ताशी १०० किमीच्या वेगानं (14806 R) ही मालगाडी धावल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. . या मालगाडीचा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लोको पायलटशिवाय निघालेल्या मालगाडीचं पुढे काय झालं?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर कथुआ येथून निघालेल्या मालगाडीला पंजाबच्या मुकेरियन येथील उंची बस्सी भागात थांबवण्यात आलं. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं जम्मूच्या डिविजनल ट्रॅफिक मॅनेजरनं एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.

थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिलात का?

लोको पायलटशिवाय निघालेली मालगाडी स्टेशनवरून सुसाट जात असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कथुआ स्टेशनवर थांबलेली ही मालगाडी लोको पायलटशिवाय धावू लागली आणि दोन तासात १६० किमीचं अंतर पार केल्यानंतर मुकेरियाच्या उंची बस्सी येथे जाऊन थांबली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेत कोणतीही जिवितहानी झाही नाहीय. रेल्वे ट्रॅकवर स्लोप असल्याने मालगाडी सुरु झाली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकोपायलट आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं समजतय. याप्रकरणी चौकशी सुरु असून या घटनेमागचं नेमकं कारण शोधलं जात आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस