परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया 
राष्ट्रीय

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या मुद्द्यावरून सरकारने मेटासोबत केलेल्या कडक चर्चेचे परिणाम दिसून आले असून या विषयात अधिक संवेदनशीलता आणि कृती पाहायला मिळत आहे, अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी मंगळवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या मुद्द्यावरून सरकारने मेटासोबत केलेल्या कडक चर्चेचे परिणाम दिसून आले असून या विषयात अधिक संवेदनशीलता आणि कृती पाहायला मिळत आहे, अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी मंगळवारी दिली. असा मजकूर कायद्याचे उल्लंघन असून, कायद्याच्या उल्लंघनामध्ये कंपन्यांना कसलेही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारचा उद्देश कोणत्याही प्रकारे सेन्सॉरशिप लादणे किंवा मजकुरावर बंधने आणणे हा नसून भारतीय कायदे आणि नियमांचे पालन व्हावे व सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम कमी व्हावेत हा आहे. सरकारचा संदेश योग्य ठिकाणी पोहोचला आहे, असे सूत्रांनी सांगितले. मेटाने अल्गोरिदम, प्रणाली कसे काम करतात हे स्पष्ट केले. यावर चर्चा सुरू असून अशा प्रकरणांमध्ये योग्य निर्णय आणि तांत्रिक बदल आवश्यक असतात, असे तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी नमूद केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग