@VijayWadettiwar Twitter
राष्ट्रीय

गुजरातच्या जीएसटी आयुक्तांची साताऱ्यात ६४० एकर जमीन; सरकार कारवाई करणार का? - विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात दुर्गम कांदाटी खोऱ्यातील ६४० एकर जमीन अत्यंत अल्पदरात खरेदी केली आहे. जमीन खरेदी करणारा अधिकारी गुजरातचा जीएसटी आयुक्त आहे. त्याने जागा खरेदी करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. या अधिकाऱ्यावर काय करावाई करणार? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत वनमंत्र्यांना केला.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात दुर्गम कांदाटी खोऱ्यातील ६४० एकर जमीन अत्यंत अल्पदरात खरेदी केली आहे. जमीन खरेदी करणारा अधिकारी गुजरातचा जीएसटी आयुक्त आहे. त्याने जागा खरेदी करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. या अधिकाऱ्यावर काय करावाई करणार? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत वनमंत्र्यांना केला.

कांदाटी खोऱ्यातील जमीन खरेदी करताना कमाल मर्यादा पायदळी तुडविली. वनजमिनीतून रस्ते खोदून काढले, खोदकाम करताना महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. महसूलच्या जागेतून रस्ता काढला. करोडो रुपयांचा महसूल बुडाला. ज्या ठिकाणी वन कायद्याचे उल्लंघन झाले. अवैध बांधकाम सुरू केले, जंगलतोड केली, पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. विशेष म्हणजे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा हा परिसर आहे. तरीदेखील राजरोसपणे हे सगळे सुरू आहे. सरकार त्यावर का कारवाई करत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत वनमंत्र्यांना केला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी