राष्ट्रीय

चॉकलेट, नूडल्स, साबण महागणार; कंपन्या किमतीत ५ टक्के वाढ करण्याच्या तयारीत

केंद्र सरकारकडून जीएसटी करसवलत देण्यात आली. त्यानंतर वस्तूंच्या किमती कमी केल्याच्या घोषणा एफएमसीजी कंपन्यांनी केल्या होत्या.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जीएसटी करसवलत देण्यात आली. त्यानंतर वस्तूंच्या किमती कमी केल्याच्या घोषणा एफएमसीजी कंपन्यांनी केल्या होत्या. आता या कंपन्यांनी चॉकलेट, साबण, कपड्याचे साबण, नूडल्स आदींच्या दरात ५ टक्क्यांनी वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये सरकारने जीएसटी दरांमध्ये कपात केली होती. त्याचा परिणाम रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवर झाला आणि एफएमसीजी कंपन्यांची उत्पादने स्वस्त झाली होती.

मात्र आता परिस्थिती बदलत आहे. देशातील फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत. अनेक कंपन्या सुमारे ५ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ग्राहकांवर महागाईचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

जीएसटी दर कपातीनंतर कंपन्यांनी काही काळासाठी किमती स्थिर ठेवल्या होत्या. मात्र आता कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे कंपन्यांच्या नफ्यावर दबाव वाढला आहे. याच कारणांमुळे कंपन्या दरवाढ करण्याचा निर्णय घेत आहेत.

वितरकांचे म्हणणे आहे की, या तिमाहीपासून डिटर्जंट, हेअर ऑइल, चॉकलेट आणि नूडल्ससारखी अनेक रोजच्या वापरातील उत्पादने नव्या आणि जास्त किमतींनी बाजारात येऊ लागली आहेत. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो.

खर्च वाढल्याने एफएमसीजी कंपन्या दरवाढीचा मार्ग स्वीकारत आहेत. डाबर इंडियाचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी सांगितले की, कंपनी चालू चौथ्या तिमाहीत सुमारे २ टक्क्यांपर्यंत दरवाढ करत आहे.

डाबर जूस, हेअर ऑइलसह अनेक एफएमसीजी उत्पादने तयार करते. नफा कमी करण्याच्या नियमांमुळे यापूर्वी दरवाढ पुढे ढकलावी लागली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय घेणे आवश्यक झाले आहे.

रोज वापरात येणारे साबण, शॅम्पू आणि डिटर्जंटसारखी होम व पर्सनल केअर उत्पादनेही आता महाग होणार आहेत.

हिंदुस्थान युनिलिव्हरचे मुख्य वित्त अधिकारी निरंजन गुप्ता यांनी संकेत दिले की, होम केअर उत्पादनांच्या किमतींमध्ये लवकरच वाढ दिसून येईल. काही उत्पादने आधीच नव्या किमतींसह बाजारात आली आहेत, तर उर्वरित उत्पादनांच्या किमतींमध्येही लवकरच बदल केला जाणार आहे.

रेवडी संस्कृतीवर ताशेरे; राज्य तोट्यात, तरीही खिरापत का वाटता? रोजगार निर्मितीवर भर द्या! सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना फटकारले

Mumbai : सव्वा वर्षांनंतर एकनाथ शिंदेंचा महापौर? मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण बदलणार; महायुतीत एकमत झाल्याची चर्चा

Mumbai-Pune Expressway वर पुन्हा वाहतूककोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा

ICC T20 World Cup 2026 : फिरकीपटूंविरुद्ध घाई टाळावी! सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या अभिषेकला तज्ज्ञांचा सल्ला

Mumbai : मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरीचा Video व्हायरल