ANI
राष्ट्रीय

महिला दहशतवादी शमा परवीनला बंगळुरुमधून अटक; गुजरात ATS ची कारवाई

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल-कायदा’ची महिला दहशतवादी शमा परवीनला बंगळुरुमधून अटक केली आहे. कर्नाटकात राहणारी शमा परवीन ‘अल कायदा’चे मॉड्युल चालवत होती. शमा परवीन मूळची झारखंडची असून ती बंगळुरुमध्ये राहत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर एटीएसने छापेमारी करुन तिला अटक केली असून सध्या तिची कसून चौकशी केली जात आहे.

Swapnil S

अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल-कायदा’ची महिला दहशतवादी शमा परवीनला बंगळुरुमधून अटक केली आहे. कर्नाटकात राहणारी शमा परवीन ‘अल कायदा’चे मॉड्युल चालवत होती. शमा परवीन मूळची झारखंडची असून ती बंगळुरुमध्ये राहत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर एटीएसने छापेमारी करुन तिला अटक केली असून सध्या तिची कसून चौकशी केली जात आहे.

शमा परवीन (३०) ही ‘एक्यूआयएस’ची एक प्रमुख दहशतवादी महिला आहे. तिचे सोशल मीडिया खाते रडारवर होते, अशी माहिती एटीएसने दिली आहे. शमा परवीन बेरोजगार आहे, तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती चिथावणी देणाऱ्या गोष्टी, व्हिडीओ पोस्ट करत होती. देशविरोधातही चिथावणी देत होती. शमा पाकिस्तानशी संबंधित आहे याचे डिजिटल पुरावेही सापडले आहेत. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी या कारवाईबाबत एटीएसचे अभिनंदन केले आहे. एटीएसला मिळालेले हे मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परवीन काय करत होती?

शमा परवीन इन्स्टाग्राम आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवरुन जिहादी पोस्ट, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत होती. तिच्या फॉलोअर्सना ती चिथावत होती. ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देत होती. सरकार आणि भारताचे संविधान याच्याविरोधी वातावरण कसे तयार होईल यासाठी हेतुपुरस्सर वातावरण निर्मितीचे काम शमा करत होती, असे एटीएसने स्पष्ट केले आहे.

अटक कशी झाली?

शमा बंगळुरुतील हेब्बल भागात एका भाडे तत्त्वावरच्या घरात तिच्या लहान भावासह वास्तव्य करत होती. शमाचा भाऊ एका कंपनीत काम करतो. या घरावर एटीएसने छापा मारला आणि शमाला अटक करण्यात आली. तिच्या अटकेनंतर तिला कोर्टात नेण्यात आले. त्यानंतर ट्रांझिट वॉरंट घेऊन गुजरातला आणण्यात आले. या मोहिमेची तयारी एटीएसकडून मागच्या काही दिवसांपासून सुरु होती.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा