ट्रकने ४१ भाविकांना चिरडले; १५ जणांचा मृत्यू, २५ जखमी; ग्वाल्हेरमधील घटना, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 
राष्ट्रीय

ट्रकने ४१ भाविकांना चिरडले; १५ जणांचा मृत्यू, २५ जखमी; ग्वाल्हेरमधील घटना, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात रविवारी पहाटे नवरात्रीच्या प्रार्थनेसाठी मंदिराबाहेर जमलेल्या भाविकांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसला. या ट्रकने ४१ हून अधिक भाविकांना चिरडले. या भीषण दुर्घटनेत किशोरवयीन मुलांसह १५ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Swapnil S

ग्वाल्हेर/भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात रविवारी पहाटे नवरात्रीच्या प्रार्थनेसाठी मंदिराबाहेर जमलेल्या भाविकांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसला. या ट्रकने ४१ हून अधिक भाविकांना चिरडले. या भीषण दुर्घटनेत किशोरवयीन मुलांसह १५ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री मोहनलाल यादव यांनी दिले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, पंजाब नोंदणी क्रमांक असलेला आणि धान्य घेऊन जाणारा हा ट्रक पहाटे दीडच्या सुमारास ‘चिनार रोड’वरील ‘नो-एन्ट्री’ क्षेत्रात घुसला. तिथे दर्शनासाठी वाट पाहत असलेल्या भाविकांना आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना धडक दिल्यानंतर, हा ट्रक ‘शीतला माता’ मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाऊन आदळला. त्यात मंदिराच्या भिंतीचा काही भाग कोसळला, व दरडीखाली अनेक लोक अडकले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावेत व ज्यामुळे चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात ती डावीकडे वळवली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जर ट्रक सरळ गेला असता, तर तो ६०० ते ७०० भाविकांच्या गर्दीत शिरला असता, असेही त्यांनी नमूद केले.

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये आणि इतर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींच्या उपचारांचा खर्चही सरकारच उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भरधाव ट्रकने बॅरिकेड्सही तोडले

जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी पत्रकारांना सांगितले की, हा ट्रक भरधाव वेगाने मंदिराच्या दिशेने येत असताना त्याने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. ट्रक थांबवण्याचा प्रयत्न करताना दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. तसेच, प्रादेशिक परिवहन कार्यालयाला या वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातातील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले

Mumbai : हुश्श! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा; कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा