राष्ट्रीय

ज्ञानव्यापी मशिदीसंबंधातील सुनावणी! सर्वोच्च न्यायालयाने इंतेझामिया मशीद समितीची याचिका फेटाळली

वाराणसीमधील ज्ञानव्यापी मशिदीच्या त्या जागी पुन्हा मंदिर उभारण्याच्या प्रकरणी हे एकल पीठ सुनावणी करीत आहे.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : ज्ञानव्यापी मशिदीचे प्रकरण २०२१ पासून एकसदस्यीय पीठासमोर सुनावणीसाठी असून ते उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायालयात हस्तांतरित करण्यात यावे, या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा निर्णय रद्दबातल ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

वाराणसीमधील ज्ञानव्यापी मशिदीच्या त्या जागी पुन्हा मंदिर उभारण्याच्या प्रकरणी हे एकल पीठ सुनावणी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी. परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अंजुमन इंतेझामिया मशीद समितीच्या वतीने (एआयएमसी) सुनावणीसाठी आली होती. त्यावर या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. वरिष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी मशीद समितीच्या वतीने ही याचिका सादर केली होती.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या आदेशात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. त्यांच्या निर्णयाचा विचार करता तशा प्रकारची कृती ही सर्वसाधारण न्यायालयीन प्रक्रियेतील एक भाग आहे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. या संबंधात हस्तांतरित करण्याबद्दलच्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर सरन्यायाधीशांनी सांगितले की, खुल्या न्यायालयात आपणाला त्याचे वाचन करावयाचे नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने या संबंधात ३० ऑक्टोबरला सदर सुनावणीला ८ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. अंजुमन इंतेझामिया मशीद समितीच्या वतीने (एआयएमसी) एकल पीठाकडून उच्च न्यायालयाच्या अन्य पीठाकडे देण्यास आव्हान देण्यात आले होते.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त