PTI
राष्ट्रीय

झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी घेतली शपथ

झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी गुरुवारी राज्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Swapnil S

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी गुरुवारी राज्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज भवनात सोरेन यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

‘जेएमएम’चे सर्वेसर्वा शिबू सोरेन, हेमंत सोरेन यांची आई रुपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील आघाडीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन या शपथविधीला हजर होते. भूखंड घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची २८ जून रोजी कारागृहातून सुटका करण्यात आली.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन