राष्ट्रीय

हेमंत सोरेन यांची कोठडी पाच दिवसांनी वाढवली

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची पाच दिवसांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी एका विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी पाच दिवसांनी वाढविली.

Swapnil S

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची पाच दिवसांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी एका विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी पाच दिवसांनी वाढविली.

२ फेब्रुवारी रोजी विशेष पीएमएलए (द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट) न्यायालयाने पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती जी बुधवारी संपली. अंमलबजावणी संचालनालयाने सात दिवसांच्या कोठडीसाठी विनंती केली होती. ज्याला आम्ही कडाडून विरोध केला. ईडीला पाच दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली," असे अॅडव्होकेट जनरल राजीव रंजन यांनी पत्रकारांना सांगितले. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सात तासांच्या चौकशीनंतर ३१ जानेवारीच्या रात्री सोरेनला अटक केली होती. त्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार