राष्ट्रीय

वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ,गहू तांदूळ, खाद्यतेल महागले : सर्वसामान्य हैराण

वर्षभरापूर्वी १०४ रुपये किलो असलेली तूरडाळ काही ठिकाणी आता १०८ रुपये किलो झाली आहे.

वृत्तसंस्था

गेल्या वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सरकारने अनेक प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. मिठाच्या दरातही वाढ झाली आहे. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार डाळींचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम थेट स्वयंपाकघरातील खर्च वाढण्यावर होता. सरकारी आकडेवारीनुसार, उडीद आणि तूर यांच्या भावात अवघ्या ६ आठवड्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी तांदळाची किंमत ३४.८६ रुपये प्रति किलो होती, ती आता ३७.३८ रुपये झाली आहे. गहू २५ रुपयांवरून ३०.६१ रुपये, तर मैदा २९.४७ रुपयांवरून ३५ रुपये किलो झाला आहे.

देशात तूरडाळीचे भाव वेगवेगळे आहेत. वर्षभरापूर्वी १०४ रुपये किलो असलेली तूरडाळ काही ठिकाणी आता १०८ रुपये किलो झाली आहे. तर महाराष्ट्रातील लातूरमध्ये दीड महिन्यापूर्वी ९७ रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या चांगल्या दर्जाच्या तूर डाळीचा एक्स मिल भाव आता ११५ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

उडीद डाळ १०४ रुपयांवरून १०७ रुपये किलो, मसूर डाळ ८८ रुपयांवरून ९७ रुपये आणि दूध ४८.९७ रुपयांवरून ५२.४१ रुपये प्रतिलिटर झाले आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार किरकोळ महागाईचा दर अजूनही ६ टक्क्यांवर राहणार आहे. ग्राहक मंत्रालयाने तेल कंपन्या आणि संघटनांना तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेकदा आवाहन केले आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, ते सतत तेलाच्या किमती कमी करत आहेत. मात्र खुल्या बाजारात तेलाचे दर अजूनही दीडशे रुपयांच्या वर आहेत.

वर्षभरापूर्वीच्या तुलनेत तूर क्षेत्रात ४.६ टक्के घट झाली आहे, तर उडदाच्या क्षेत्रात २ टक्के घट झाली आहे.

८ ऑगस्ट रोजी २०२२ रोजी शेंगदाणा तेल १८८ रुपये किलो असून ८ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचा दर १७६ रुपये होता. तर मोहरीचे तेल १७४ रुपये असून वर्षभरापूर्वी ते १६९ रुपये होते.

वनस्पती तेल सध्या १५४ रुपये असून वर्षभराआधी ते १३४ रुपये होते. सोया तेल सध्या ५७ रु. असून वर्षभरापूर्वी हा भाव १४८ रु. होता. सूर्यफूल तेल १८० रुपये असून वर्षभरापूर्वी १६६ रु. होते. बटाटा सध्या २८ रु. किलो असून वर्षभरापूर्वी हा दर २० रु. होता. तसेच मीठ सध्या २० रु. किलो असून एक वर्षआधी २० रु. दर होता.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर