राष्ट्रीय

IMF चा पाकिस्तानला धक्का; कर्जाच्या पुढील हप्त्यासाठी लादल्या नव्या ११ अटी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेला तणाव हा बेलआऊट कार्यक्रमासाठी धोका असल्याचे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे. तसेच कर्जाचा पुढील टप्पा देण्यासाठी पाकिस्तानवर ११ नवीन अटी लादल्या आहेत. आता कर्जासाठी पाकिस्तानवरील एकूण अटी ५० झाल्या आहेत.

Swapnil S

वॉशिंग्टन : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेला तणाव हा बेलआऊट कार्यक्रमासाठी धोका असल्याचे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे. तसेच कर्जाचा पुढील टप्पा देण्यासाठी पाकिस्तानवर ११ नवीन अटी लादल्या आहेत. आता कर्जासाठी पाकिस्तानवरील एकूण अटी ५० झाल्या आहेत.

भारतासोबतच्या वाढत्या तणावामुळे जागतिक नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला इशारा दिला आहे की, जर परिस्थिती सुधारली नाही तर पाकिस्तानच्या १ अब्ज डॉलरच्या (सुमारे ८,५४२ कोटी रुपये) बेलआऊट कार्यक्रमाचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो.

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाच्या काळातच पाकिस्तानला जागतिक नाणेनिधीने १ अब्ज डॉलरचे कर्ज दिले होते. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले.

नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने ९ मे रोजी पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचे कर्ज तत्काळ वितरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर आता नाणेनिधीने पाकिस्तानला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानवर कर्ज देताना पुढील टप्प्यांसाठी ११ नवीन अटी लादल्या आहेत. तसेच भारताबरोबरच्या तणावामुळे योजनेच्या वित्तीय, बाह्य आणि सुधारणा उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे