ANI
राष्ट्रीय

केआरके अटकेनंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये भरती, छातीत दुखत असल्याचे समोर...

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल केआरकेने काही वादग्रस्त ट्विट केले होते

प्रतिनिधी

बॉलिवूडवर सतत टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरके सतत चर्चेत असतो. वादग्रस्त ट्विट करणे ही आता केआरकेची सवय झाली आहे. मंगळवारी (३० ऑगस्ट) त्याला वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल केआरकेने काही वादग्रस्त ट्विट केले होते. त्यासाठी त्याला अटक करण्यात आली.

केआरकेच्या अटकेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. एवढेच नाही तर केआरकेबद्दलचे अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. मात्र आता वेगळीच माहिती समोर आली आहे. केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र काही तासांतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एएनआयच्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री केआरकेच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. केआरकेला पोलिसांनी सोमवारी (२९ ऑगस्ट) रात्री मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी (३० ऑगस्ट) दुपारी बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.

2020 मध्ये, कमाल खानने अभिनेता अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' चित्रपटाशी संबंधित एक अपमानजनक ट्विट पोस्ट केले होते. केआरकेच्या अटकेनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. इरफानच्या मृत्यूनंतर केआरकेने त्याच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक