राष्ट्रीय

बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा;दीड वर्षात एनपीए चार टक्के होण्याची शक्यता

वृत्तसंस्था

बँकांमधील वसुली न होणाऱ्या कर्जाचा (एनपीए) दर कमी होत आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, मार्च २०२३ पर्यंत बँकांचे एकूण एनपीए ०.९० टक्के ते ५ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर मार्च २०१४ पर्यंत परिस्थिती आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे. बँकांचा सकल एनपीए फक्त चार टक्के असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. हा दर एका दशतालील सर्वात कमी असणार आहे.

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोविड महामारीनंतर अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा झालेली आहे. त्यामुळे एनपीए झालेल्या कर्जाचा परतावा मिळू लागला आहे. याशिवाय कर्ज काढण्याचे प्रमाणही वाढले असून काही राइट ऑफची वसुली सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रॉस एनपीए सातत्याने कमी होत आहे. येत्या काही वर्षांत हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. एनपीएची घटना बँकांची स्थिती सुधारण्याचे सर्वात मजबूत लक्षण मानले जात आहे. बँका त्यांचे काही भाग किंवा सर्व एनपीए नॅशनल अ‌ॅसेट रिकन्सट्रक्शन कंपनीला विकू शकतील.

अर्थव्यवस्था रुळावर आल्याने उद्योगधंदे परत येऊ लागले, त्यामुळे बँकांची कर्जे परत येऊ लागली. बँकांनी पाच वर्षांत १० लाख कोटींची कर्जे राइट ऑफ केली, एनपीए कमी झाला. क्रिसिलच्या मते, २०२३-२४पर्यंत कॉर्पोरेट कर्जातील एनपीए पातळी दोन टक्क्यांच्या खाली येण्याची अपेक्षा आहे.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम