राष्ट्रीय

देशात नवीन रोजगार संधींमध्ये वाढ

वृत्तसंस्था

देशात नवीन रोजगार संधींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) २०२१-२२ या वर्षात १ कोटी २२ लाख नवीन रोजगारांची नोंदणी झाली आहे. संघटीत क्षेत्रात एका वर्षात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.

केंद्र सरकारकडून रोजगारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात एकूण १ कोटी २२ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. एका वर्षात मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी २०२०-२१ या वर्षात ७७ लाख १० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. २०१९-२० या वर्षात ७८ लाख आणि २०१८-१९ या वर्षात ६१ लाख १० हजार नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. विशेष म्हणजे जानेवारीपासून रोजगारनिर्मितीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्च २०२२मध्ये देशभरात १५ लाख ३० हजार नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत त्यात १९.५ टक्के वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात १२ लाख ८० हजार रोजगार निर्माण झाले होते.

ईपीएफओमध्ये नोंदणी करणाऱ्या आस्थापनांची संख्या देखील वाढली असल्याचे दिसून आले आहे. 'ईपीएफओ'कडे मार्च महिन्यात १ लाख १८ हजार आस्थापनांनी पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांसाठी 'पीएफ'चा भरणा केला. फेब्रुवारीत ७८ हजार १३३ आस्थापनांनी 'पीएफ'ची वजावट केली होती. मार्च महिन्यात नोकरी मिळवण्यात २०-२५ वयोगटातील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत