स्वातंत्र्यदिनानिमित्त ७८ शौर्य पुरस्कार जाहीर; १३ मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश X | ANI
राष्ट्रीय

स्वातंत्र्यदिनानिमित्त ७८ शौर्य पुरस्कार जाहीर; १३ मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) सैनिकांसाठी १३ मरणोत्तर पुरस्कारांसह एकूण ७८ शौर्य पुरस्कार मंजूर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये ९ कीर्ती चक्रे, १९ शौर्य चक्रे, ५ 'बार टू सेना' पदके (शौर्य) आणि ३६ सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) सैनिकांसाठी १३ मरणोत्तर पुरस्कारांसह एकूण ७८ शौर्य पुरस्कार मंजूर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये ९ कीर्ती चक्रे, १९ शौर्य चक्रे, ५ 'बार टू सेना' पदके (शौर्य) आणि ३६ सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे.

कीर्ती चक्र विजेते :

२१ पॅरा (स्पेशल फोर्सेस) चे लेफ्टनंट कर्नल मनोज फ्रान्सिस, २ पॅरा (स्पेशल फोर्सेस) चे मेजर जितेंद्र राठी, (इतर सात जणांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले आहे.)

मरणोत्तर कीर्ती चक्र प्राप्त सैनिक :

हवालदार गजेंद्र सिंग (२ पॅरा स्पेशल फोर्सेस), हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंग, हेड कॉन्स्टेबल बशीर अहमद, कॉन्स्टेबल जसवंत सिंग, कॉन्स्टेबल बलविंदर सिंग, कॉन्स्टेबल तारिक हुसेन, इन्स्पेक्टर सुनील कुमार

शौर्य चक्र विजेते :

मेजर परमवीर (३६ राष्ट्रीय रायफल्स), मेजर तरुण वासुदेवन (५७ राष्ट्रीय रायफल्स), मेजर केशव कुमार (१२ डोगरा रेजिमेंट), मेजर गौरव सिंग ब्रिजवाल (२१ ग्रिनेडियर्स), मेजर विपिन कुमार (११ राष्ट्रीय रायफल्स), नायब सुभेदार शंकर राम (३ आसाम रायफल्स), नायब सुभेदार डब्बल सिंग बिष्ट (२१ पॅरा -स्पेशल फोर्सेस) हवालदार जगत्तर सिंग (४ पॅरा - स्पेशल फोर्सेस), लांस नाईक नरेंद्र सिंधू (९ राष्ट्रीय रायफल्स -मरणोत्तर), लांस नाईक कपिल देव (११ राष्ट्रीय रायफल्स), सिपाही जसविंदर सिंग (७ सिख लाईट इन्फंट्री), लेफ्टनंट कमांडर शिवम कुमार (भारतीय नौदल), स्क्वॉड्रन लीडर सुधीर कुमार (भारतीय हवाई दल).

इतर शौर्य चक्र विजेते अधिकारी व जवान :

धीरज सिंग कटोच (उपअधीक्षक), अजय सिंग चिब (इन्स्पेक्टर), सुखवीर सिंग उपअधीक्षक, नियाज अहमद (सहाय्यक उपनिरीक्षक), अंजनी कुमार (डेप्युटी कमांडंट) आणि दीपक शाह (कॉन्स्टेबल)

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जनगणनेसाठीची प्रश्नावली जारी; जातींची माहिती घेणार, रोजगार, आर्थिक व्यवहार, स्थलांतर याबाबतही सवाल

Mumbai : मध्य रेल्वेवर आजपासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल धावणार; अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीतील प्रवाशांना दिलासा

Mumbai : 'मुलुंड डम्पिंग'ची जागा अदानींशी संबंधित कंपनीला; १५ एकर जमीन पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच आघाडीवर; ३६ हजार कंपन्या बंद झाल्याच्या माहितीचा विपर्यास : मुख्यमंत्र्यांचा दावा

फाळणीच्या बळींचे मोदींनी केले स्मरण