भारतात डेंग्यूवरील पहिल्या लशीला मंजुरी प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

भारतात डेंग्यूवरील पहिल्या लशीला मंजुरी

भारतात डेंग्यूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतात डेंग्यूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. 'ताकेडा फार्मास्युटिकल्स इंडिया' या जपानी बहुराष्ट्रीय कंपनीच्या 'क्यूडेन्गा' या डेंग्यू प्रतिबंधक लशीला भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. भारतात मान्यता मिळालेली ही पहिलीच डेंग्यू लस ठरली असून, ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींना ही लस देता येईल.

पूर्वी डेंग्यूचा संसर्ग झालेला असो वा नसो, ही लस कोणत्याही व्यक्तीला पूर्व-चाचणी न करता दिली जाऊ शकते, ही लस त्वचेखाली (०.५ मि.ली.) दिली जाते. दोन डोसचा हा कोर्स असून, पहिला व दुसरा डोस यामध्ये तीन महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे, डेंग्यू विषाणूच्या चारही सेरोटाइप्सविरुद्ध ही लस प्रभावी संरक्षण प्रदान करते.

ताकेडा कंपनीच्या आंतरखंडीय बाजारपेठ विभागाचे प्रमुख महेंद्र नायक यांनी सांगितले की, २०२२ मध्ये लाँच झाल्यापासून 'क्यूडेन्गा' लशीला आतापर्यंत ४३ देशांमध्ये मंजुरी मिळाली असून, जगभरात ३.२ कोटींपेक्षा जास्त डोस वितरित करण्यात आले आहेत. सात वर्षांच्या वैद्यकीय आकडेवारीनुसार, ही लस डेंग्यू संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून दीर्घकाळ संरक्षण देते.

भारतातील या मंजुरीसाठी ताकेडा कंपनीने जागतिक पातळीवर १९ टप्प्यांमध्ये २८,००० हून अधिक सहभागींवर घेतलेल्या चाचण्यांचा डेटा सादर केला. याशिवाय, भारतात ४ ते ६० वयोगटातील नागरिकांवर घेतलेल्या डेन-३०२ फेज-३ क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डब्ल्यूएचओकडून मान्यता

जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांत या लशीच्या वापराची शिफारस केली आहे. तसेच डब्ल्यूएचओकडून 'प्रिक्वॉलिफिकेशन' मिळाल्यामुळे युनिसेफ आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे या लशीची खरेदी व पुरवठा सुलभ होणार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहतात? आता NHAI चा डिजिटल लोकल पास मिळवा RajmargYatra App वरून, जाणून घ्या डिटेल्स