भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग १० टक्के वेगाने वाढणार; देशांतर्गत मागणी, वाढत्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात क्षेत्र वाढण्याची उद्योगाला अपेक्षा प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग १० टक्के वेगाने वाढणार; देशांतर्गत मागणी, वाढत्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात क्षेत्र वाढण्याची उद्योगाला अपेक्षा

भू-राजकीय आव्हाने असूनही, देशांतर्गत मागणी आणि मजबूत निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात भारतीय वाहन सुटे भाग क्षेत्र ८ ते १० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती उद्योग संस्था ‘ॲक्मा’ने मंगळवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : भू-राजकीय आव्हाने असूनही, देशांतर्गत मागणी आणि मजबूत निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात भारतीय वाहन सुटे भाग क्षेत्र ८ ते १० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती उद्योग संस्था ‘ॲक्मा’ने मंगळवारी दिली.

कार्बन न्यूट्रॅलिटीवर सरकारचा असलेला भर, विविध देशांसोबत होत असलेले मुक्त व्यापार करार, मूळ उपकरण उत्पादक आणि मोबिलिटी क्षेत्रातील नवीन कंपन्यांकडून होणारा क्षमता विस्तार आदी सरकारी धोरणे अनुकूल घटक ठरले आहेत.

मागील आर्थिक वर्षात जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची कामगिरी चांगली राहिली. निर्यात ५ टक्क्यांनी वाढून २४ अब्ज डॉलर (₹ २,१२,१७६ कोटी) वर पोहोचली. यामध्ये युरोप खंडात सर्वाधिक वाढ झाली, तर इंजिन कंपोनंट्स, ड्राईव्ह ट्रान्समिशन आणि स्टिअरिंगचा वाटा एकूण निर्यातीत अर्ध्याहून अधिक होता.

प्रगत तंत्रज्ञान आणि विशेष सुट्या भागांच्या वाढत्या मागणीमुळे आयात १३ टक्क्यांनी वाढून २५.४ अब्ज डॉलर (₹ २,२४,२८७ कोटी) झाली.

  • सुटे भाग उद्योगाची उलाढाल - ₹ ७.६० लाख कोटी

    (मागील वर्ष) - ($ ८५.९ अब्ज)

  • रुपयाच्या मूल्यातील वाढ - १२.७ टक्के

  • ५ वर्षांचा विकास दर - १७ टक्के

  • चालू आर्थिक वर्षातील अपेक्षित वाढ - ८% ते १०%

भारतीय ऑटो कंपोनंट्स उद्योगाचा मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे. देशांतर्गत वाढती मागणी, पायाभूत सुविधांवर आधारित आर्थिक वाढ, उत्पादनातील वाढती गुंतवणूक, मुक्त व्यापार करारांमुळे जागतिक स्तरावर मजबूत होत असलेले स्थान आणि भारताकडून वाढणारे ग्लोबल सोर्सिंग (जागतिक खरेदी) यांमुळे या क्षेत्रासाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
विक्रमपती सिंघानिया, अध्यक्ष, अ‍ॅक्मा आणि व्हीआयपी चेअरमन व एमडी, जेके फेनर इंडिया
या उद्योगाबाबत आर्थिक वर्ष २०२७ च्या वाढीच्या अंदाजाबाबत सांगायचे तर पहिली तिमाही ही अत्यंत मजबूत राहिली आहे. हीच गती वर्षभर कायम राहिली, तर चालू वर्षात ८ ते १० टक्के वाढ या उद्योगाला सहज राखता येईल. वाहनांच्या सुटे भाग उद्योगाला गती देणारे आणि त्याचबरोबर त्याची वाढ रोखणारे पश्चिम आशियातील तणाव, अमेरिकेतील टॅरिफ, चीनकडून असलेले व्यापारी अडथळे आदी मुद्दे आहेत.
विन्नी मेहता, महासंचालक, अ‍ॅक्मा

ईव्ही विक्रीचा विक्रम

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किरकोळ विक्रीने जून महिन्यात ३,०६,२२० युनिट्सचा विक्रमी टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत यात ६३ टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण वाहन विक्रीत ईव्हीचा वाटा १२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन’ने दिली. पावसाचे लांबलेले आगमन, मंदीचा काळ असूनही ईव्ही क्षेत्रातील सर्वच विभागांमध्ये ही ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग