घरगुती PNG वापराला प्रोत्साहन; सरकार शहर वायू वितरण कंपन्यांना अतिरिक्त गॅस देणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

घरगुती PNG वापराला प्रोत्साहन; सरकार शहर वायू वितरण कंपन्यांना अतिरिक्त गॅस देणार

घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजीऐवजी पाइपद्वारे गॅस जोडणी घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी आणि कंपन्यांना यासाठी अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार प्रत्येक नवीन बिलिंग सुरू झालेल्या घरगुती पाइप-गॅस जोडणीमागे शहर गॅस वितरण कंपन्यांना अतिरिक्त २०० स्टँडर्ड क्युबिक मीटर कमी दराचा देशांतर्गत नैसर्गिक गॅस उपलब्ध करून देणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजीऐवजी पाइपद्वारे गॅस जोडणी घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी आणि कंपन्यांना यासाठी अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार प्रत्येक नवीन बिलिंग सुरू झालेल्या घरगुती पाइप-गॅस जोडणीमागे शहर गॅस वितरण कंपन्यांना अतिरिक्त २०० स्टँडर्ड क्युबिक मीटर कमी दराचा देशांतर्गत नैसर्गिक गॅस उपलब्ध करून देणार आहे.

सरकारने मंजूर केलेली ही प्रोत्साहन योजना १ सप्टेंबरपासून लागू होणार असून, प्रत्येक भौगोलिक क्षेत्रासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक मिळालेल्या अतिरिक्त घरगुती पीएनजी जोडण्यांवर लागू होईल. तेल मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, निष्क्रिय आणि बिलिंग न सुरू असलेल्या जोडण्या कार्यरत करणे आणि नवीन भागांमध्ये पीएनजी नेटवर्कचा विस्तार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना प्रत्येकी सहा महिन्यांच्या दोन टप्प्यांत राबवली जाईल.

प्रोत्साहन काय?

अतिरिक्त कोटा : प्रत्येक नवीन बिलिंग सुरू झालेल्या घरगुती पीएनजी कनेक्शनमागे सरकार सिटी गॅस वितरकांना २०० स्टँडर्ड क्युबिक मीटर अतिरिक्त, स्वस्त देशांतर्गत नैसर्गिक वायू उपलब्ध करून देणार आहे.

अंमलबजावणी : तेल मंत्रालयाने जाहीर केलेली ही योजना १ सप्टेंबरपासून लागू होईल. प्रत्येक भौगोलिक क्षेत्रासाठी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त दिलेल्या नवीन कनेक्शनवर हा नियम लागू असेल.

उद्दिष्ट : एलपीजी सिलिंडरऐवजी स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर वाढवणे, निष्क्रिय असणारे कनेक्शन कार्यरत करणे आणि नवीन भागात नेटवर्कचा विस्तार करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या भारतात १.७४ कोटी घरगुती पीएनजी कनेक्शन्स आहेत.

शेअर्समध्ये तेजी : प्रोत्साहन घोषणेनंतर अदानी टोटल गॅस, इंद्रप्रस्थ गॅस, महानगर गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : २२ बेस्ट डेपोंच्या विकासाला मंजुरी; पालिकेत खडाजंगी; आधीच्या डेपो-विक्रीबाबत श्वेतपत्रिका काढा- विरोधकांची मागणी

अभियंत्यांच्या बदल्यांसाठी 'फिल्डिंग'! मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप; मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर

Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी 

FDA ची नजर आता शाळा-कॉलेजच्या कॅंटिनकडे; लवकरच दिसतील परिणाम, तुकाराम मुंढेंचे संकेत

Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी