इथेनॉलचा पुरवठा ९८७ कोटी लिटरवर; अन्नधान्य आधारित घटकांचे नेतृत्व : AIDA 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

इथेनॉलचा पुरवठा ९८७ कोटी लिटरवर; अन्नधान्य आधारित घटकांचे नेतृत्व : AIDA

चालू पुरवठा वर्षात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत भारताचा एकत्रित इथेनॉल पुरवठा ९८७ कोटी लिटरवर पोहोचला असून, यामध्ये अन्नधान्यापासून तयार होणाऱ्या घटकांचा वाटा एकूण पुरवठ्याच्या ७१ टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती ऑल इंडिया डिस्टिल्डर्स असोसिएशनने (एआयडीए) गुरुवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : चालू पुरवठा वर्षात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत भारताचा एकत्रित इथेनॉल पुरवठा ९८७ कोटी लिटरवर पोहोचला असून, यामध्ये अन्नधान्यापासून तयार होणाऱ्या घटकांचा वाटा एकूण पुरवठ्याच्या ७१ टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती ऑल इंडिया डिस्टिल्डर्स असोसिएशनने (एआयडीए) गुरुवारी दिली.

एआयडीएने एका निवेदनात म्हटले आहे की, इथेनॉल पुरवठा वर्ष २०२५-२६ (नोव्हेंबर-ऑक्टोबर) मध्ये तेल विपणन कंपन्यांमार्फत एकूण ९८७ कोटी लिटरचा पुरवठा झाला. तो १,१९७ कोटी लिटरच्या एकूण कंत्राटी वाटपाच्या तुलनेत ८२.५ टक्के पूर्ण झाल्याचे दर्शवतो.

अन्नधान्य आधारित घटकांनी ९०८ कोटी लिटरच्या वाटपाविरुद्ध ७०५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला. तो ७७.६ टक्केपूर्ती दर दर्शवतो. एकूण वाटपाच्या ६१४ कोटी लिटरच्या तुलनेत मक्याचा वाटा ४१३ कोटी लिटर म्हणजेच एकूण पुरवठ्याच्या ४१ टक्क्यांहून अधिक असून, तो सर्वाधिक एकल वाटा ठरला.

भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) जादा तांदळाने २३३ कोटी लिटरच्या वाटपाविरुद्ध २२२ कोटी लिटरचा पुरवठा केला. तर खराब झालेले अन्नधान्य त्यांच्या ६० कोटी लिटरच्या वाटपापेक्षा जास्त म्हणजे ७० कोटी लिटरचा पुरवठा करून पुढे राहिले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Mumbai : दहिसर, एक्सर कोळीवाड्यांचे नवीन सीमांकन; फडणवीस सरकारचा निर्णय

Mumbai : समुद्राचे खारे पाणी गोडे करायला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार; २.३६ किमी लांब बोगद्यातून समुद्राचे पाणी उचलणार

Mumbai : एफडीएचा निर्णय बचत गटांसाठी ‘तिखट’च; सुट्या मसाला विक्रीवर बंदी

SIR निकालाचा फेरविचार करा! माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे सर्वोच्च न्यायालयाला आवाहन