राष्ट्रीय

'भारत चंद्रावर!' : 'चांद्रयान ३'चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग

'चांद्रयान ३'चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या पडल्याने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातला पहिला देश ठरला आहे.

नवशक्ती Web Desk

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी अभिमानाची आणि गौरवाची बातमी समोर आली आहे. इस्त्रोचं 'चांद्रयान ३' आज (२३ ऑगस्ट) संध्यााकाळी ६ वाजून ४ मिनीटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झालं आहे. यामुळे देशातील १४० कोटी भारतीयांना उर अभिमानाने भरून आला आहे. 'चांद्रयान ३' चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या पडल्याने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातला पहिला देश ठरला आहे.

'चांद्रयान 3' चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्विरित्या लँड झाल्याने भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. १४ जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या 'चांद्रयान ३' चा पृथ्वी ते चंद्र हा प्रवास यशस्वी झाला आहे. भारताच्या चांद्रमोहिमेकडे संपूर्ण जागाचं लक्ष लागून होतं. यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमाने फुलुन गेली आहे.

इस्त्रोला गेल्या दोन मोहिमेत अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र भारतानं हार न मानता आपले प्रयत्न सुरु ठेवले. 'चांद्रयान ३' मोहिमेला २०२० मध्ये सुरुवात करण्यात आली होती. भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न आज अखेर पूर्णत्वास आलं आहे. आंध्र प्रदेशाच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून १४ जूलैला दुपारी २.३५ वाजता 'चांद्रयान ३' ने यशस्वी उड्डाण केलं होतं आणि आज हे यान चंद्रावर जाऊन पोहचलं आहे.

भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्यास यशस्वी झाल्याने दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कायम अंधार असतो. तसंच या ठिकाणचं वातावरण अत्यंत थंड असल्याचं सांगितलं जातं. भारताच्या 'चांद्रयान १' ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. आता चंद्रावर पाण्याचे साठे शोधणं हे 'चांद्रयान ३' चं प्रमुख उद्दिष्ट आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील विविध नमुने गोळा करून इस्रत्रो त्यावर संशोधन करणार आहे.

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती