(छायाचित्र - पीटीआय)
राष्ट्रीय

भारताकडून दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी

भारताने सोमवारी दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. ओदिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताने सोमवारी दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. ओदिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आली.

या चाचणीनंतर संरक्षण खात्याने सांगितले की, क्षेपणास्त्राच्या सर्व यंत्रणा अपेक्षेप्रमाणे योग्य पद्धतीने काम करत आहेत. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहे. यामुळे हे क्षेपणास्त्र चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहे.

डीआरडीओने ओदिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी केंद्रावरून या क्षेपणास्त्राची मंगळवारी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम, टेलिमेट्री आदींच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली.

हे क्षेपणास्त्र डीआरडीओ लॅबोरेटरी, भारतीय उद्योग व एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट आदींनी विकसित केले आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा या क्षेपणास्त्र निर्मितीत सहभाग आहे. या चाचणीच्यावेळी डीआरडीओचे शास्त्रज्ञ, सैन्य दलाच्या तीन क्षेत्राचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी