राष्ट्रीय

शुभांशू शुक्ला १९ जूनला अंतराळात जाणार

‘ॲॅक्सिओम-४’ या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणाऱ्या मोहिमेला अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आतापर्यंत तीन वेळा ही मोहीम पुढे ढकलली आहे. आता येत्या १९ जूनला भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह तीन अंतराळवीर प्रयाण करणार आहेत, असे ‘इस्रो’ने सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘ॲॅक्सिओम-४’ या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणाऱ्या मोहिमेला अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आतापर्यंत तीन वेळा ही मोहीम पुढे ढकलली आहे. आता येत्या १९ जूनला भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह तीन अंतराळवीर प्रयाण करणार आहेत, असे ‘इस्रो’ने सांगितले.

‘ॲॅक्सिओम’ अंतराळ मोहीम नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रावरून ११ जूनला सुरू होणार होती. मात्र, यानातून इंधन गळती झाल्याने ते प्रक्षेपण पुढे ढकलले. आता ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. आता ‘ॲॅक्सिओम’ मोहीम १९ जूनपासून सुरू होईल. ही मोहीम पहिल्यांदा २९ मे, त्यानंतर ८ जून, त्यानंतर १० जून, नंतर ११ जून रोजी निघणार होती. पण त्यात वेळोवेळी तांत्रिक अडचणी येत गेल्या. नासाचे माजी अंतराळवीर व ‘ॲॅक्सिओम स्पेस’चे संचालक पेग्गी व्हिटसन यांच्याकडे या मोहिमेची जबाबदारी आहे, तर ‘इस्रो’चे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे वैमानिक असतील.

मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ऑडिओ क्लिपप्रकरणी फॉरेन्सिक तपास; महायुतीत बेबनाव वाढत चालला

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

FSSAI च्या नियमांना महाराष्ट्राचे उच्च न्यायालयात आव्हान; राज्याच्या अधिकारांवर केंद्राने अतिक्रमण केल्याचा आरोप

भारत-चीन सैन्यात चकमकी; अरुणाचलबाबत इंडो-तिबेट सीमा दलाच्या महासंचालकांचा गौप्यस्फोट