राष्ट्रीय

Indian Family Murder : अमेरिकेतील भारतीय अपहरण झालेल्या कुटुंबाचे मृतदेह समोर ; आठ महिन्याच्या मुलीचा समावेश

वृत्तसंस्था

ज्या पंजाबी कुटुंबाचे त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीसह अमेरिकेत अपहरण करण्यात आले होते त्यांचे मृतदेह एका बागेत सापडले आहेत. बागेत सापडलेल्या मृतदेहांमध्ये आई, वडील, काका आणि आठ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. मर्स्ड काउंटी शेरीफने सांगितले की सर्व मृतदेह मर्सिड काउंटीमध्ये सापडले आहेत. त्याआधी, यूएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौघांचे 3 ऑक्टोबर रोजी दक्षिण महामार्ग 59 च्या 800 ब्लॉकमधून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरण केलेल्या संशयिताचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी ४८ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण झालेले कुटुंब भारतातील आहे. तो पंजाबमधील होशियापूर जिल्ह्यातील टांडा येथील रहिवासी आहे. कुटुंबाचा अमेरिकेत स्वतःचा वाहतूक व्यवसाय होता. जसदीप सिंग (36 वर्षे), जसदीपची पत्नी जसलीन कौर (27 वर्षे), मुलगी आरुही ढेरी (आठ महिने) आणि अमनदीप सिंग (39 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी या कुटुंबाची गाडी जळालेल्या अवस्थेत आढळून आली. मृतांपैकी एकाचे एटीएम कार्ड अपहरणकर्त्याने वापरले आहे. त्यानंतर पोलिसांनी एटीएम वापरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. अपहरणकर्त्याचा नेमका हेतू काय होता, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलावर कारवाई होणार का? पुणे अपघातावर काय म्हणाले फडणवीस?

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण