राष्ट्रीय

भारतीय युद्धनौकेला पाकच्या जहाजाची धडक

भारतीय नौदलाच्या एका प्रमुख युद्धनौकेला अरबी समुद्रात पाकिस्तानी नौदलाच्या 'पीएनएस हुमैन' या जहाजाने धडक दिल्याचा प्रकार घडला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: भारतीय नौदलाच्या एका प्रमुख युद्धनौकेला अरबी समुद्रात पाकिस्तानी नौदलाच्या 'पीएनएस हुमैन' या जहाजाने धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर भारताने बुधवारी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारी यांना परराष्ट्र मंत्रालयात समन्स बजावून बोलावले आणि पाकिस्तानी नौदलाच्या या "अस्वीकारार्ह व अव्यावसायिक वर्तनाबद्दल" तीव्र शब्दात विरोध नोंदवला.

भारतीय युध्दनौका नियमित गस्त आणि टेहळणी मोहिमेवर असताना अतिशय वेगाने आलेल्या हुमैन जहाजाशी टक्कर झाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. भारतीय युद्धनौकेला धडक देणारे पाकिस्तानी नौदलाचे जहाज 'पीएनएस हुमैन' हे 'ऑफशोअर पेट्रोल वेसल' असल्याचे सूत्रांनी बुधवारी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल