राष्ट्रीय

भारताच्या आर्थिक विकासाला वित्तीय पाठबळ मिळणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन

वृत्तसंस्था

भारताच्या आर्थिक विकासाला वित्तीय पाठबळ तसेच गुंतवणूकविषयक पाठबळ मिळत राहील, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.

चीनच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या दुसऱ्या बैठकीत केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने सहभागी झाल्या.

सीतारामन म्हणाल्या की, ब्रिक्स संघटनेने शाश्वत आणि समावेशक विकासाच्या प्रवासाचा मार्ग नव्याने आखण्यासाठी चर्चेत सहभागी होता यावे तसेच अनुभव, चिंता आणि संकल्पना यांचे आदानप्रदान सोपेपणाने व्हावे यासाठीचा मंच म्हणून यापुढेही कार्यरत राहावे, असे त्या म्हणाल्या.

वर्ष २०२२ च्या ब्रिक्स आर्थिक सहकार्यविषयक कार्यक्रमाबाबत चर्चा करणे हा या बैठकीच्या आयोजनामागील उद्देश होता. यात ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि प्रमुख बँकांचे गव्हर्नर यांचे संयुक्त निवेदन, पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, नव्या विकास बँका आणि ब्रिक्स देशांचे अर्थविषयक विचारमंथनाचे जाळे या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा याचा यात समावेश आहे.

ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि या देशांतील प्रमुख बँकांचे गव्हर्नर यांनी यावेळी पायाभूत सुविधाविषयक गुंतवणूक, नवीन विकास बँक, ब्रिक्स देशांच्या आकस्मिक निधीची सोय इत्यादी ब्रिक्स संबंधित आर्थिक मुद्यांवर चर्चा केली.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ