IndiGo विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

IndiGo विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग

विशाखापट्टणमहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Swapnil S

नवी दिल्ली : विशाखापट्टणमहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सुदैवाने, विमानात असलेले सर्व १६० प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र वैमानिकांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे फ्लाइट ६ई ५७९ विशाखापट्टणमहून दिल्लीच्या दिशेने झेपावले होते. मात्र, प्रवासादरम्यान विमानाच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून सकाळी १०.३९ वाजता दिल्ली विमानतळावर 'पूर्ण आणीबाणी' घोषित करण्यात आली.

इंडिगोचे स्पष्टीकरण

या घटनेनंतर इंडिगो एअरलाइन्सने अधिकृत पत्रक जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, २८ मार्च २०२६ रोजी विशाखापट्टणम ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या इंडिगो फ्लाइट ६ई ५७९ मध्ये लँडिंगच्या काही वेळ आधी तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळले.

खबरदारीचा उपाय म्हणून आणि मानक कार्यप्रणालीनुसार वैमानिकांनी प्राधान्याने लँडिंगची विनंती केली होती. त्यानुसार विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. सर्व संबंधित यंत्रणांना तात्काळ सूचित करण्यात आले असून, सध्या विमानाची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती सुरू आहे, असे इंडिगोच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल

Pune : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आगमन मिरवणूक

बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठ

Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचण