@ANI
@ANI
राष्ट्रीय

G20 Summit : महिलांच्या सहभागाशिवाय वैश्विक विकास शक्य नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रतिनिधी

जी-२० शिखर परिषदेचा (G20 Summit) दुसरा आणि शेवटचा दिवस नुकताच पार पडला. यावेळी इंडोनेशियाने जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी जी-२० परिषदेची भारताच्या अध्यक्षतेखालील भूमिका स्पष्ट केली, तसंच महिला केंद्रीत विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली. भारत १ डिसेंबरपासून नवी दिल्ली येथे जी-२० गटाच्या नेत्यांची शिखर परिषद आयोजित करणार आहे. डिसेंबर महिन्यात उदयपूरमध्ये उद्घाटन होणार आहे. यावेळी राजस्थानमधील तीन शहरे या गटाचे आयोजन करणार आहेत. जयपूर, उदयपूर आणि जोधपूरमध्ये परिषद होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हंटले की, "भारताचे जी-२० अध्यक्षपद सर्वसमावेशक आणि महत्त्वाकांक्षी असेल. पुढील वर्षभरात आमचा प्रयत्न असेल की जी-२० सामूहिक कृतीला गती देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रमुख प्रवर्तक म्हणून काम करेल. जी-२० कडून जगाला आशा आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. १ डिसेंबरपासून भारत जी-२०चे अध्यक्षपद भूषवणार आहे." पुढे त्यांनी म्हंटले की, " जी-२० अजेंडामध्ये आपण महिला केंद्रीत विकासावर भर द्यायला हवा. यासोबतच शांतता आणि सुरक्षाही प्रदान करायला हवी. वैश्विक विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. कारण त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञानाचे फायदे घेता येणार नाही. यासाठी जी-२० मध्ये काम करायला हवे."

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने

कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू