राष्ट्रीय

महागाईचा उडणार भडका; सरकारकडून नैसर्गिक वायूच्या मूळ दरात ४ टक्क्यांनी वाढ; सीएनजी, पीएनजी महागणार

मूळ नैसर्गिक वायूपासून सीएनजी व पीएनजी तयार होत असल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा भडका सर्वत्र उडणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या मूल्य निर्धारण दरात (एपीएम) ४ टक्क्याने वाढ केली आहे. मूळ नैसर्गिक वायूपासून सीएनजी व पीएनजी तयार होत असल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा भडका सर्वत्र उडणार आहे.

एक एप्रिलपासून सरकारने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवले आहेत. म्हणजेच सरकारने प्रति एमएमबीटीयू दरात ०.२५ टक्क्याने वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना पेट्रोलियम खात्यातील पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ॲॅनालिसिस विभागाने काढली आहे.

हा नैसर्गिक वायू ओएनजीसी व ऑइल इंडिया लिमिटेड उत्पादन करतात. या नैसर्गिक वायूचा वापर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पीएनजी व वाहन, खत व विजेसाठी लागणाऱ्या सीएनजी निर्मितीसाठी वापरला जातो. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच नैसर्गिक वायूच्या मूळ दरात वाढ झाली आहे.

सरकारने एप्रिल २०२३ मध्ये नवीन नैसर्गिक वायू मूल्य निर्धारण धोरण तयार केले. यानुसार, कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दराच्या १० टक्के दर नैसर्गिक वायूचा असेल, असे निर्धारित केले होते.

तेल खात्यातील पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ॲॅनालिसिस विभागाने सांगितले की, १ ते ३० एप्रिल २०२५ मध्ये नैसर्गिक वायूचा दर ७.२६ डॉलर प्रति एमएमबीटीयू राहील, असे जाहीर केले. मात्र या दरांवर नियंत्रण आणल्याने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवला आहे. हे दर नियंत्रण एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे. पुढील एप्रिल २०२६ मध्ये नैसर्गिक वायूच्या दरात ०.२५ डॉलर प्रति एमएमबीटीयूने वाढणार आहे.

एप्रिल २०२३ मध्ये नैसर्गिक वायूचा मूळ दर हा दरमहा घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर दर नियंत्रण ठेवले आहे. सध्या या दर नियंत्रणाची मर्यादा ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू आहे.

ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार

नैसर्गिक वायूच्या हा मूळ दराने शहर गॅस वितरण कंपन्यांना वितरीत केला जातो. त्यातून या कंपन्या सीएनजी व पीएनजी तयार करतात. घरगुती वायू उत्पादनाचा ७० टक्के भाग हा एपीएम वायूतून येतो. शहरातील गॅस वितरण कंपन्या आपली ६० टक्के गॅसचे वितरण या एपीएम गॅसच्या माध्यमातून करतात. आता या कंपन्या आपल्या दरात वाढ करतील. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात?

आजचे राशिभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप