राष्ट्रीय

‘आयएनएस तमल’ १ जुलैला नौदलात

भारतीय नौदलात ‘आयएनएस तमल’ ही क्षेपणास्त्राधारित विनाशिका येत्या १ जुलै रोजी सामील होणार आहे. ही विनाशिका रशियाच्या कालिनीग्राड येथे भारताच्या ताब्यात दिली जाईल. या विनाशिकेतील २६ टक्के सुटे भाग भारतीय आहेत. यात ब्रह्मोस हे क्रूझ क्षेपणास्त्र बसवले आहे. ही विनाशिका १२५ मीटर लांब असून ३,९०० टनाची आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय नौदलात ‘आयएनएस तमल’ ही क्षेपणास्त्राधारित विनाशिका येत्या १ जुलै रोजी सामील होणार आहे. ही विनाशिका रशियाच्या कालिनीग्राड येथे भारताच्या ताब्यात दिली जाईल. या विनाशिकेतील २६ टक्के सुटे भाग भारतीय आहेत. यात ब्रह्मोस हे क्रूझ क्षेपणास्त्र बसवले आहे. ही विनाशिका १२५ मीटर लांब असून ३,९०० टनाची आहे. भारत व रशियाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ती सुसज्ज आहे. ही विनाशिका म्हणजे भारतीय नौदलाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवाल यांनी सांगितले.

ही विनाशिका कालिनीग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये बनवण्यात आली. कालिनीग्राड येथे होणाऱ्या सोहळ्याला व्हाईस ॲॅडमिरल संजय सिंग, रशिया व भारतीय संरक्षण क्षेत्रातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विनाशिकेचा कमाल वेग ताशी ३० सागरी मैल आहे. यात २५० नौसैनिक राहू शकतात. गेल्या तीन महिन्यांपासून या विनाशिकेच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल