राष्ट्रीय

निर्लज्जपणाचा कळस! समय रैना, रणवीर अलाहबादियाविरोधात नेटकऱ्यांचा संताप; शो देखील 'बॉयकॉट' करण्याची मागणी

युट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असून टीकेची झोड उठली आहे. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये नुकत्याच झालेल्या एका भागाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून निर्लज्जपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया देत नेटकरी रैना आणि अलाहबादिया या दोघांसह शो देखील बॉयकॉट करण्याची मागणी करीत आहेत.

Swapnil S

युट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असून टीकेची झोड उठली आहे. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये नुकत्याच झालेल्या एका भागाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून निर्लज्जपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया देत नेटकरी रैना आणि अलाहबादिया या दोघांसह शो देखील बॉयकॉट करण्याची मागणी करीत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?

रणवीर अलाहबादिया अलिकडेच कंटेट क्रिएटर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा यांच्यासह समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोमध्ये प्रशिक्षक म्हणून गेला होता. यावेळी त्याने एका स्पर्धकाला माता-पित्याच्या शारीरिक संबंधांबाबत अत्यंत अश्लील आणि किळसवाणा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकून सुरूवातीला समय रैनासह अन्य प्रशिक्षकही हैराण झाले, पण कहर म्हणजे पुढच्याच क्षणी त्यांनी जोरजोरात खिदळत प्रश्नाचं समर्थन तर केलंच शिवाय प्रोत्साहन देखील दिलं.

अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याची तक्रार दाखल

शो रद्द करण्याची आणि बॉयकॉटची मागणी होत असताना 'हिंदू आयटी सेल' नावाच्या संघटनेने कायदेशीर पाऊल उचलले आहे. ''आम्ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे'', अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली. अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याची तक्रार रैना आणि अलाहबादियाविरोधात करण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी इंटरनेटवर ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर इंटरनेट वापरकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे. दोघांवरही नेटकरी सडकून टीका करत असून हा निर्लज्जपणाचा कळस आहे, शोवर बंदी घाला, बॉयकॉट करा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लिल प्रकार करणाऱ्यांवर काहीतरी निर्बंध हवेत, अशी मागणी करीत प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे.

समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो यापूर्वीही वादात होता. काही दिवसांपूर्वीच एका स्पर्धकाने अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांबाबत केलेल्या अवमानकारक विधानामुळे एफआयआर देखील दाखल झाली होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत