राष्ट्रीय

अजित पवारांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण

Swapnil S

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारदेखील अयोध्येत हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून यासाठी दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यातच आता अजित पवार यांनादेखील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाकरिता महाराष्ट्रातून सात पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आले आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस