ANI
राष्ट्रीय

ISIS Terrorist: ‘आयसिस’च्या दहशतवाद्याला अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ‘आयसिस’च्या पुणे मॉड्यूलशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केल्याचे शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ‘आयसिस’च्या पुणे मॉड्यूलशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केल्याचे शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दहशतवाद्याचे नाव रिझवान अब्दुल हाजी अली असे असून, तो दिल्लीच्या दर्यागंजचा रहिवासी आहे. विशेष कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अधिकाऱ्यांनी रिझवान याला दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून अटक केली. त्याला पकडण्यासाठी तीन लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

रिझवान याच्याकडून शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे. रिझवानकडून दिल्ली-एनसीआरस्थित काही व्हीआयपींवर हल्ला करण्यात येण्याची शक्यता होती, त्या संदर्भात त्याची चौकशी केली जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा