राष्ट्रीय

सीरियातील विमानतळांवर इस्रायलचे हल्ले दमास्कस, अलेप्पो विमानतळ निकामी

विमानतळांवरील वाहतूक लटाकिया विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आली

नवशक्ती Web Desk

जेरुसलेम : इस्रायलच्या सुरक्षा दलांनी रविवारी सीरियामधील दमास्कस आणि अलेप्पो या शहरांतील विमानतळांवर हवाई बॉम्बफेक केली. या हल्ल्यांमुळे दोन्ही विमानतळ निकामी झाले आहेत. हल्ल्यात एका नागरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झाला. पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी हल्ला झाल्याचे स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्यानंतर या दोन विमानतळांवरील वाहतूक लटाकिया विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आली.

हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सीरियाच्या या दोन विमानतळांवर केलेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजीदेखील इस्रायलने दमास्कस आणि अलेप्पो विमानतलांवर हल्ला केला होता. तेव्हा त्यात ५ जण जखमी झाले होते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत