प्रगत उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इस्रोने रचला नवा इतिहास, रियल टाइम चित्र पुरवणार X / @isro
राष्ट्रीय

प्रगत उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इस्रोने रचला नवा इतिहास, रियल टाइम चित्र पुरवणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी इतिहास रचत देशाचा पहिला भू-स्थिर कक्षेतील प्रगत भू-निरीक्षण उपग्रह 'ईओएस-०५' यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. जीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने २,३०० किलोग्रॅमहून अधिक वजनाचा हा उपग्रह अत्यंत अचूकपणे अपेक्षित कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे.

Swapnil S

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी इतिहास रचत देशाचा पहिला भू-स्थिर कक्षेतील प्रगत भू-निरीक्षण उपग्रह 'ईओएस-०५' यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. जीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने २,३०० किलोग्रॅमहून अधिक वजनाचा हा उपग्रह अत्यंत अचूकपणे अपेक्षित कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे.

सर्वात वजनदार उपग्रह

सामान्यत: भू-निरीक्षण उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत असतात, मात्र RDaSm-05 उपग्रह पृथ्वीपासून तब्बल ३६,००० किमी उंचावर असलेल्या भू-स्थिर कक्षेत तैनात केला जाईल. येथे त्याचा वेग पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाशी तंतोतंत जुळेल.

२,३६७ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह जीएसएलव्ही रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे.हा उपग्रह म्हणजे कोणतीही 'गुप्तचर यंत्रणा' किंवा 'स्पाय सॅटेलाइट' असल्याचा दावा इस्रोने फेटाळून लावला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ऑडिओ क्लिपप्रकरणी फॉरेन्सिक तपास; महायुतीत बेबनाव वाढत चालला

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

FSSAI च्या नियमांना महाराष्ट्राचे उच्च न्यायालयात आव्हान; राज्याच्या अधिकारांवर केंद्राने अतिक्रमण केल्याचा आरोप

भारत-चीन सैन्यात चकमकी; अरुणाचलबाबत इंडो-तिबेट सीमा दलाच्या महासंचालकांचा गौप्यस्फोट