राष्ट्रीय

चनप्रीतसिंगने काँग्रेस, तृणमूल, भाजपसाठीही काम केल्याचे स्पष्ट; 'आप'चे नेते भारद्वाज यांचा दावा

Swapnil S

नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेला आरोपी चनप्रीतसिंग याने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षांसाठीच नव्हे तर भाजपसाठीही काम केले असल्याचा दावा मंगळवारी 'आप'ने केला. असे असतानाही भाजप 'आप' आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही 'आप'ने म्हटले आहे.

मद्यधोरण घोटाळा मनी लाँड्रिंगप्रकरणी सोमवारी ईडीने चनप्रीतसिंग याला अटक केली, त्याने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी निधी वापरल्याचे उघड झाले. भाजप आप आणि केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला. चनप्रीतसिंग याला गेल्या वर्षी सीबीआयने अटक केली होती, मात्र त्याला गेल्या वर्षीच जामीनही मिळाला, त्याने विविध पक्षांसाठी काम केले आहे, हे आपले म्हणणे नसून सीबीआयच्या दस्तावेजातच तसे नमूद केले आहे, असेही भारद्वाज म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस